
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशाच्या बँकिंग व्यवस्थेत एक मोठा बदल जाहीर केला आहे. आता तुम्हाला चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागणार नाही. तर चेकवर प्रक्रिया केली जाईल आणि काही तासांतच रक्कम खात्यात ट्रान्सफर केली जाईल. या नवीन प्रणालीचा उद्देश चेक क्लिअरिंगचा वेग वाढवणे, जोखीम कमी करणे आणि ग्राहकांना चांगला अनुभव देणे आहे.