
देशात रक्षाबंधनाच्या सणापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा व्याजदरात कपात करण्याची भेट देऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्स कपात करण्याची घोषणा केली जाऊ शकते.