
जर तुम्हीही सोन्याचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सोन्याच्या कर्जाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कर्जदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, मध्यवर्ती बँकेने २.५ लाख रुपयांपर्यंत सोन्याचे कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्ज-मूल्याचे (LTV) प्रमाण ८५ टक्के केले आहे. जे सध्या ७५ टक्के आहे.