डॉ. वीरेंद्र ताटकेआपल्या काही मित्रांनी २०२४ वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या आर्थिक संकल्पांचा आढावा हे वर्ष संपताना घेतला आहे. त्यांच्या नियोजनात काही चुका झाल्या आहेत. त्यातून बोध घेऊन आपण नव्या वर्षात अधिक अचूक नियोजन करू शकतो..गृहकर्जाची घाईसुरेशने २०२४ च्या सुरुवातीला हक्काचे घर खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपयांचे गृहकर्ज घेण्यासाठी दोन बँकांकडे अर्ज केला. एका बँकेने त्यासाठी खूप कागदपत्रे मागितली, तर दुसऱ्या बँकेत मात्र त्याचे काम चटकन झाले. मात्र, या दुसऱ्या बँकेच्या गृहकर्जावरील व्याजाचा दर पहिल्या बँकेपेक्षा दोन टक्क्यांनी जास्त होता. दोन टक्क्यांनी फार काही फरक पडणार नाही, असा विचार करून सुरेशने अधिक व्याजदर असलेल्या बँकेकडून १५ वर्षांच्या मुदतीचे ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले. नंतर त्याच्या मित्राने ऑनलाइन ‘ईएमआय’ कॅल्क्युलेटरच्या मदतीने दोन टक्के अधिक व्याजदरामुळे सुरेशला अतिरिक्त १४ लाख रुपयांची परतफेड करावी लागणार आहे, हे दाखवून दिले. स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जाण्याच्या उत्साहात सुरेशने ही चूक केली. त्यामुळे गृहकर्ज घेताना शांतपणे व्यवस्थित हिशेब करून निर्णय घेणे गरजेचे आहे, याची खूणगाठ बांधायला हवी..शेअरविक्रीतील अधीरतामहेशने वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारातील ब्ल्यूचिप कंपन्यांचे शेअर खरेदी करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणीदेखील केली. एप्रिल २०२४ मध्ये डी-मॅट खाते उघडून त्याने तीन महिने शांतपणे शेअर बाजारातील चांगल्या कंपन्यांच्या शेअरच्या बाजारभावाचा अभ्यास केला, त्यातून तीन निवडक कंपन्या निवडल्या आणि जुलै २०२४ पासून त्या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्याने ख्ररेदी सुरु केली. पहिल्या चार-पाच महिन्यांतच त्याच्या गुंतवणुकीवर फायदा दिसू लागला. त्याने ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली होती; पण अधीर होऊन त्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व शेअर विकून टाकले. मात्र, जुलै २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या आणि त्याच कालावधीत विकलेल्या शेअरवरील फायद्यावर प्राप्तिकराच्या अल्पकालीन भांडवली नफ्याच्या नियमानुसार २० टक्के प्राप्तिकर द्यावा लागणार आहे, असे त्याच्या करसल्लागार मित्राने त्याला सांगितल्यावर त्याला आपल्या अधीरपणे घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला. त्यामुळे अधीरतेने निर्णय घेऊ नये, असा संकल्प करणे श्रेयस्कर आहे..‘पीपीएफ’ आवश्यकउमेशने जानेवारी २०२४ मध्ये ‘पीपीएफ’ खाते सुरू केले आणि लगेच त्यात दहा हजार रुपयांची रक्कमही जमा केली. मात्र, त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात त्या खात्यात रक्कम जमा करण्यास तो विसरून गेला. खरेतर प्रत्येक आर्थिक वर्षात किमान पाचशे रुपये जमा करून ‘पीपीएफ’ खाते सुरळीत सुरू ठेवता येते हा नियम त्याला माहित आहे; पण कामाच्या गडबडीत तो ते विसरून गेला. करबचत, चांगला परतावा आणि सुरक्षितता असे तिहेरी लाभ देणारे ‘पीपीएफ’ खाते सुरळीत सुरू ठेवण्यासाठी न विसरता पैसे भरणे महत्त्वाचे आहे, याची काळजी घेऊ या..Tarapur Fire : तारापूर औद्योगिक वसाहतींमधील 'के झोन' कारखान्याला भीषण आग....‘टीडीएस’ वाचवागणेशच्या वडिलांना निवृत्तीनंतर दुसरे काहीही उत्पन्न नसल्याने त्याने त्यांच्या नावे बँकेत मुदत ठेव ठेवली. त्यातून वडिलांना वर्षभरात साधारण एक लाख रुपये व्याज मिळते. कामाच्या व्यापात गणेश फॉर्म १५ एच जमा करायला विसरला. त्यामुळे व्याजाच्या रकमेतून बँकेने ‘टीडीएस’ वजा केला. त्यामुळे त्याच्या वडिलांना मिळणारी रक्कम कमी झाली. नव्या वर्षात याबाबतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची काळजी घेण्याचा संकल्प करू या..‘एसआयपी’तील गुंतवणूकइंडेक्स फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरते, हे ऐकून रमेशने सप्टेंबर २०२४ मध्ये इंडेक्स फंडात एकरकमी मोठी गुंतवणूक केली; पण त्याला जोडून त्याच फंडात ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू करायला त्याने कंटाळा केला. सप्टेंबर २०२४ मध्ये सर्वोच्च पातळीवर असलेला ‘सेन्सेक्स’ त्यानंतर गडगडला आणि रमेशच्या एकरकमी गुंतवणुकीवर तोटा दिसायला लागला. त्या फंडात त्याने ‘एसआयपी’ सुरू केली असती, तर कमी किमतीत म्युच्युअल फंड युनिट खरेदी करण्याची संधी त्याला मिळाली असती. त्यामुळे नव्या वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना, ‘एसआयपी’ला प्राधान्य देण्यावर भर दिला पाहिजे.तेव्हा आपल्या या मित्रांनी केलेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी त्यांना २०२५ वर्षांत नक्की मिळेल. आपणही यातून शिकू या आणि नव्या वर्षात आपल्या आर्थिक नियोजनात सुधारणा करू या!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.