

वयाच्या २१व्या वर्षी अनेकजण शिक्षण, नोकरी किंवा करिअरमध्ये काय करायचं याचाच विचार करत असतात. पण ब्रिटनमधील तरुणाने आपल्या छंदाचे रुपांतर व्यवसायत केलं. विशेष म्हणजे यातून त्याने मोठी कमाईसुद्धा केलीय. रॉबी कार्टराइट याने आपल्या स्नीकर्सच्या छंदाचं व्यवसायात रूपांतर केलं. रॉबी हा ‘Yorkshire Trainers’चा संस्थापक आहे. त्याच्या व्यवसायाने मे महिन्यात एका महिन्यात २ लाख ८० हजार डॉलरपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे २.६४ कोटी रुपयांची उलाढाल केली. हा आकडा रॉबीची वैयक्तिक कमाई किंवा नफा नसून कंपनीने केलेल्या एकूण विक्रीचा आहे.