

साठेखत की खरेदीखत? मालकीहक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
ई सकाळ
Sathekhat vs Sale Deed: Supreme Court Clarifies What Gives Real Ownership
ॲड. रोहित एरंडे
rohiterande@hotmail.com
एखाद्या मिळकतीमध्ये मालकीहक्क कसा मिळतो, याबाबत आपल्याकडे बरेच गैरसमज दिसून येतात. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच ‘रमेश चंद वि. सुरेश चंद (सी.ए. क्र. ६३७७/२०२२, निकाल ता. ०१/०९/२०२५) या याचिकेवर निकाल देताना हे स्पष्ट केले, की केवळ ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’च्या आधारावर किंवा साठेखताच्या आधारावर विकत घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही. योग्य मुद्रांक शुल्क भरलेल्या नोंदणीकृत खरेदीखतानेच जागेचा मालकीहक्क प्राप्त होतो.