

Financial Innovation: NSE Launches Electronic Gold Receipts (EGR) Trading
Sakal
ॲड. सुनील टाकळकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार
भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोन्यात सुरक्षित आणि पारदर्शक गुंतवणूक करण्याचा एक नवा पर्याय राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) उपलब्ध केला आहे. हा पर्याय आहे, ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स’ अर्थात ‘ईजीआर’ (EGR - Electronic Gold Receipts). सोमवारपासून (ता. १८) ‘एनएसई’वर याचे अधिकृत व्यवहार सुरू होत आहेत. भांडवल बाजार नियामक ‘सेबी’च्या मंजुरीनंतर सुरू होणारा हा नवा पर्याय सोने गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग आहे.