
सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
ज्येष्ठ नागरिक आपली गुंतवणूक करताना प्रामुख्याने जास्तीतजास्त परतावा व सुरक्षितता असणाऱ्या गुंतवणुकीस प्राधान्य देतात. त्या दृष्टीने सिनिअर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम (एससीएसएस) हा एक उत्तम पर्याय आहे. यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून, सध्या (सप्टेंबरअखेरपर्यंत) यावर मिळणारा परतावा ८.२० टक्के आहे. (केंद्र सरकारकडून अल्पबचत योजनांच्या व्याजदराचा दर तिमाहीस आढावा घेतला जातो.