

The Role of Gold and Silver in 2025 Market Trends
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके (गुंतवणूक क्षेत्राचे अभ्यासक)
अर्थबोध
नमस्कार, मी ‘सेन्सेक्स’! शेअर बाजारातील तुमचा मित्र! आता २०२५ वर्ष संपायला आता फक्त दोन दिवस राहिले आहेत. अशावेळी तुमच्याशी हितगूज करायला आलो आहे. तुम्हाला माहीत आहेच, की शेअर बाजार कोणत्या दिशेने चालला आहे, हे मी तुम्हाला रोजच्या रोज सांगत असतो. हे काम १९८६ पासून मी नियमितपणे करत आहे. तसे पाहायला गेले, तर मुंबई शेअर बाजारातील तुल्यबळ अशा फक्त तीस कंपन्यांच्या शेअरच्या बाजारभावाची दिशा मी सांगत असतो; पण तुम्हा गुंतवणूकदारांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे, की ‘शितावरून भाताची परीक्षा’ या न्यायाने तुम्ही माझ्यावरून बाजाराचा अंदाज बांधता!