

BSE launches India’s first Sattvik Index, offering investors an ethical investment option rooted in cultural values while excluding alcohol, tobacco, gambling and animal-cruelty businesses.
Sakal
सुहास राजदेरकर, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
शरीयत किंवा इस्लामिक इंडेक्स आणि ‘ईएसजी’नंतर आता आगळावेगळा ‘सात्त्विक इंडेक्स’ दाखल झाला आहे. भारतातील पहिल्या ‘सात्त्विक इंडेक्स’ची स्थापना १९ जून २०२६ रोजी झाली. ‘बीएसई सात्त्विक इंडेक्स-१००’ असे या निर्देशांकाचे नाव आहे. नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असलेल्या या निर्देशांकात ‘बीएसई ५००’ निर्देशांकातून निवडलेल्या १०० कंपन्यांच्या शेअरचा समावेश असेल.