
भूषण महाजन
kreatwealth@gmail.com
एव्हरेस्ट चढाई करताना कित्येक गिर्यारोहक आपली मजल बेस कॅम्पपर्यंतच आहे, हे ठरवून टाकतात. कारण शेवटच्या टप्प्याचे आव्हान मोठे कठीण असते. तेथे होणारी दमछाक जीवघेणी असते. शिखर गाठल्यावरदेखील तेथे फार वेळ थांबता येत नाही. आपले ध्येय गाठल्याचे समाधान जरी असले, तरी पुढे आता काय... हा प्रश्न उभा राहतो. आपल्या शेअर बाजाराचेही असेच आहे.