

stock market opening
Sakal
Market Update : आज मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडला. पण त्यानंतर सुरुवातीचा काही काळ बाजारात तेजी दिसली. मात्र, सकाळी 10 च्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक पुन्हा घसरल्याचे पाहायला मिळाले. बाजारात सेन्सेक्स 153 अंकांनी घसरून 84,625 वर उघडला, निफ्टी 27 अंकांनी घसरून 25,939.95 वर उघडला, तर निफ्टी बँक 108 अंकांनी घसरून 58,006 वर उघडला.