
किरांग गांधी, kirang.gandhi@gmail.com
शेअर बाजारात अचूक वेळ साधणे अशक्य आहे, याची जाणीव प्रत्येक हुशार गुंतवणूकदाराला असते. परंतु, शेअर बाजाराचे चक्र (सायकल) समजून घेणे फायदेशीर ठरू शकते. ज्या भारतीय गुंतवणूकदारांनी विशेषतः इक्विटी आणि म्युच्युअल फंडांद्वारे दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे, त्यांनी बाजाराचे चक्र कसे समजून घ्यावे हे शिकणे म्हणजे संपत्तीनिर्मिती आणि संपत्तीचा ऱ्हास यातील फरक समजून घेणे आहे.
शेअर बाजार एका सरळ रेषेत पुढे जात नाही. तो चक्रांमध्ये फिरतो. ही चक्रे व्याजदर, चलनवाढ, कमाई वाढ, जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांची मानसिकता यांसारख्या आर्थिक घटकांनी प्रभावित होतात. बाजारचक्राचे चार टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यातील प्रमुख संकेत समजून घेतल्यास, गुंतवणूकदारांना कधी आक्रमक (अधिक गुंतवणूक करणे) व्हावे आणि कधी बचावात्मक (भांडवल राखून ठेवावे) याचे निर्णय घेण्यास मदत होईल.