Jai Balaji Industries Ltd
Jai Balaji Industries LtdSakal

Jai Balaji Industries Ltd : एका वर्षात 1700 % परतावा, कोणता आहे 'हा' शेअर ?

शेअर मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत. यापैकी काही शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना अतिशय कमी काळात उत्कृष्ट परतावा दिला आहे तर काहींनी त्यांच्या गुंतवणूकदारांना लाँग टर्ममध्ये दमदार नफा मिळवून दिला आहे.

शेअर मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत. यापैकी काही शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना अतिशय कमी काळात उत्कृष्ट परतावा दिला आहे तर काहींनी त्यांच्या गुंतवणूकदारांना लाँग टर्ममध्ये दमदार नफा मिळवून दिला आहे. यातील एक स्टॉक जय बालाजी इंडस्ट्रीजचा ( Jai Balaji Industries) आहे. आता कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ दिसून येत आहे.

गेल्या एका वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. वर्षभरात शेअर 100 ते 1000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात, स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1714% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एनएसईवर 28 एप्रिल 2023 रोजी शेअरची बंद किंमत 59.80 रुपये होती. आता 27 एप्रिल 2024 रोजी एनएसईवर हा शेअर 1085 रुपयांवर क्लोज झाला.

ऑक्टोबर 2023 मध्ये शेअरने 500 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. पण, गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 88% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एनएसईवर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1314 रुपये आहे, तर 52 आठवड्यांचा नीचांक 52.35 रुपये आहे. या कालावधीत कंपनीचे मार्केट कॅप 771.32 कोटीवरून 18,744.48 कोटीपर्यंत वाढले आहे.

25 एप्रिलला कंपनीने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षात 879.57 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला, त्यात 1,421% वाढ झाली. जय बालाजीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6,413.78 कोटीची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे, जी वार्षिक 4.71% जास्त आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत जय बालाजीचा निव्वळ नफा 272.98 कोटी होता, मागील वर्षी याच तिमाहीत 13.08 कोटीचा तोटा झाला होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com