Crisil Limited Share : 4 वर्षात 308% परतावा ; आता प्रत्येक शेअरवर 28 रुपये डिव्हिडेंड देण्याची कंपनीची तयारी...

क्रेडिट रेटिंग कंपनी क्रिसिल लिमिटेड (Crisil Limited) आपल्या शेअरहोल्डर्सना डिव्हिडेंड देणार आहे.
Crisil Limited Share
Crisil Limited Sharesakal
Updated on

क्रेडिट रेटिंग कंपनी क्रिसिल लिमिटेड (Crisil Limited) आपल्या शेअरहोल्डर्सना डिव्हिडेंड देणार आहे. कंपनी प्रत्येक शेअरवर 28 रुपये डिव्हिडेंड देण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक स्टॉकवर 2800 टक्के इतका मोठा डिव्हिडेंड देण्याची शिफारस केल्याचे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले. 16 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळणे बाकी आहे. मंजूर झाल्यास हा डिव्हिडेंड दिला जाईल. चांगल्या तिमाही निकालानंतर कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डर्सना बक्षीस म्हणून डिव्हिडेंड जारी करतात.

कंपनीच्या बोर्डाकडून मंजूरी मिळाल्यास 1 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक स्टॉकवर 2800 टक्के डिव्हिडेंड देण्याची शिफारस केल्याचे क्रिसिल लिमिटेडने बीएसईवरील एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या बोर्डाने 31 डिसेंबर 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 28 रुपये अंतिम डिव्हिडेंड देण्याची शिफारस केल्याचे कंपनीने सांगितले.

Crisil Limited Share
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

क्रिसिल लिमिटेडचा शेअर शुक्रवारी 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 5004.30 रुपयांवर बंद झाला. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,257.90 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 3,005.85 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 36,590.30 कोटी आहे. क्रिसिल शेअर्सने गेल्या एका महिन्यात दोन टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉक 29 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने 61 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, शेअरमध्ये गेल्या 4 वर्षांत त्यात 308 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com