Kotak Mahindra : कोटक महिंद्रा बँकेला ४१३३ कोटींचा नफा ; भागधारकांना प्रतिशेअर दोन रुपये लाभांश जाहीर

खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीत ४१३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, त्यात वार्षिक १८.२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Kotak Mahindra
Kotak Mahindrasakal

मुंबई : खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीत ४१३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, त्यात वार्षिक १८.२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेने आज तिमाहीचे आणि आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले. बँकेने भागधारकांना प्रतिशेअर दोन रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न चौथ्या तिमाहीत १३ टक्क्यांनी वाढून ६९०९ कोटी रुपये झाले आहे. कर्ज व्यवसायात वार्षिक २० टक्क्यांनी वाढ होऊन, तो तीन लाख ९१ हजार ७२९ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचा एकूण एनपीए मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील १.७८ टक्क्यांवरून मार्च २०२४ तिमाहीत १.३९ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर निव्वळ एनपीए ०.३७ टक्क्यांवरून ०.३४ टक्के झाला आहे.

Kotak Mahindra
Share Market : अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती तेजीला जास्त पोषक त्यामुळेच अब की बार तेईस हजार.!

बँकेकडील बचत ठेवींचे प्रमाण मार्च २०२३ मधील एक लाख १७ हजार ८२४ कोटी रुपयांच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढून एक लाख २३ हजार ४५७ कोटी रुपयांच्या झाल्या आहेत. मुदत ठेवींचे प्रमाण वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढून दोन लाख २४ हजार ७०३ कोटी रुपयांपर्यत वाढले आहे. बँकेचा स्टँडअलोन रिटर्न ऑन ॲसेट २.६१ टक्के आहे, अशी माहिती बँकेने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com