आरती ड्रग्ज (Aarti Drugs Ltd) कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी त्यांचे शेअर्स कायमच फायदेशीर ठरले आहेत. आरती ड्रग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये गुरूवारीही वाढ झाली आणि या वाढीचे प्रमुख कारण कंपनीकडून शेअर बायबॅक होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. .गेल्या गुरुवारी, आरती ड्रग्स कंपनीने जाहीर केले होते की येत्या 26 ऑगस्टला प्रस्तावित असलेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीचे बोर्ड सदस्य शेअर बायबॅक योजनेवर त्यांचा निर्णय घेऊ शकतात.स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये, कंपनीने म्हटले आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची पुढील बैठक सोमवार, 26 ऑगस्ट, 2024 रोजी होणार आहे, ज्या अंतर्गत कंपनी 10 रुपयांच्या पूर्ण पेड अप इक्विटी शेअरसाठी बायबॅकच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ शकते. ट्रेडलाइन डेटानुसार, आरती ड्रग्ज कंपनीने 2016 पासून पाच वेळा शेअर बायबॅक केले आहे..Manjushree Technopack IPO : मंजुश्री टेक्नोपॅक आयपीओमधून 3000 कोटी उभारण्याच्या तयारीत, सेबीकडे कागदपत्र दाखल....गेल्या एका वर्षात या शेअरने सपाट कामगिरी केली आहे, तर चालू कॅलेंडर वर्षात म्हणजे 2024 मध्ये, आत्तापर्यंत शेअरने 16 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या एका महिन्यात , शेअरने 10 टक्के परतावा दिला आहे.आरती ड्रग्स कंपनी त्याचा व्यवसाय प्रामुख्याने फार्मास्युटिकल क्षेत्रात करते. कंपनी 1984 पासून या क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचा संशोधन आणि विकास विभाग तारापूर इथे आहे. आरती ड्रग्ज कंपनी मुख्यत्वे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स, फार्मा इंटरमीडिएट्स आणि स्पेशॅलिटी केमिकल आणि फॉर्म्युलेशन प्रॉडक्ट्स बनवते याशिवाय, कंपनीची पिनॅकल लाइफ सायन्स नावाची उपकंपनी देखील आहे. यामध्ये कंपनीचा संपूर्ण हिस्सा आहे..Tata Sons IPO: गुंतवणूकदारांची मोठी निराशा! टाटा सन्सचा IPO येणार नाही? RBIच्या नियमांचे काय होणार?.नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.