Adani Group Shares : बुडत्याचा पाय खोलात; आज अदानी ग्रुपच्या शेअर्सचे 40,000 कोटींचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group Shares

Adani Group Shares : बुडत्याचा पाय खोलात; आज अदानी ग्रुपच्या शेअर्सचे 40,000 कोटींचे नुकसान

Adani Group Shares Crash : अदानी ग्रुप शेअर्सवर सुरू असलेले संकट आजही थांबण्याचे नाव घेत नाही. अदानी समूहाच्या सर्व 10 सूचीबद्ध शेअर्समध्ये आज जोरदार विक्री होत आहे.

गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण होत आहे कारण गुंतवणूकदार विक्रीच्या मार्गावर आहेत. आज, अदानी समूहाच्या शेअर्सच्या मोठ्या घसरणीमुळे या 40,000 कोटी रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे.

अदानी एंटरप्रायझेस आज अदानी शेअर्समध्ये टॉप लूसर :

अदानी एंटरप्रायझेस ही या समूहाची प्रमुख कंपनी आहे. अनेक क्षेत्रात काम करणारी अदानी समूह आज सर्वाधिक तोट्यात आहे आणि ती 10 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

दुपारी 12.26 वाजता, अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 11.07 टक्क्यांनी खाली 1,397.25 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर दिसत आहे.

अदानी समूहाच्या इतर शेअर्सची स्थिती :

अदानी टोटल गॅस 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटनंतर 833 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. याशिवाय अदानी विल्मारमध्येही 5 टक्क्यांनी घसरण होत असून ती प्रति शेअर 390.30 रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 5 टक्क्यांनी घसरत असून तो 539.05 रुपये प्रति शेअरवर अडकला आहे. त्याच वेळी, अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर, प्रति शेअर 789.20 रुपयांवर ट्रेडिंग होताना दिसत आहे.

अदानी समूहावर अमेरिकन कंपनी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत आहेत.

25 जानेवारीला हा अहवाल समोर आला आणि तेव्हापासून अदानी समूहाच्या शेअर्सची पडझड सुरू झाली. तेव्हापासून अदानी समूहाच्या 10 कंपन्यांचे मार्केट कॅप 11.5 लाख कोटी रुपयांवरून 7.69 लाख कोटी रुपयांवर आले आहे.