
थोडक्यात:
टेक महिंद्राचा नफा 34% वाढून ₹1,141 कोटी झाला, पण तो बाजाराच्या ₹1,211 कोटीच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.
महसूल 2.7% वाढून ₹13,351 कोटी झाला, तरी तोही अंदाजापेक्षा थोडा कमी आहे.
ब्रोकरेज कंपन्यांनी प्रतिक्रिया दिल्या; काहींनी 'Buy' दिलं, तर काहींनी 'Reduce' रेटिंग कायम ठेवलं आहे.
Tech Mahindra Share Price: देशातील प्रमुख IT कंपन्यांपैकी एक असलेल्या टेक महिंद्राने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (Q1FY26) निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा 34% ने वाढून 1,141 कोटी रुपये झाला असला, तरी शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स आज गुरुवारी 2% नी घसरले. BSE मध्ये हा शेअर 1,575 रुपयांपर्यंत खाली आला.