Anil Ambani : अनिल अंबानींची कंपनी शेअर बाजारात पडली ठप्प; RBI ने घेतला मोठा निर्णय, इथून पुढे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Ambani

Anil Ambani : अनिल अंबानींची कंपनी शेअर बाजारात पडली ठप्प; RBI ने घेतला मोठा निर्णय, इथून पुढे...

Anil Ambani News : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले उद्योगपती अनिल अंबानी हे आर्थिक संकटात आहेत. अनिल अंबानींच्या कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

RBI ने बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंह खींची यांची कंपनीच्या प्रशासकाला सल्ला देण्यासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली आहे.

श्रीनिवासन वरदराजन यांनी पॅनेलमधून राजीनामा दिल्यानंतर खींची यांची रिलायन्स कॅपिटलच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

सल्लागार समितीचे इतर दोन सदस्य संजीव नौटियाल (माजी डीएमडी, स्टेट बँक ऑफ इंडिया) आणि प्रवीण पी कडले (टाटा कॅपिटल लिमिटेडचे ​​माजी एमडी आणि सीईओ) आहेत.

"सल्लागार समिती कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेदरम्यान रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या गव्हर्नन्समध्ये सल्लागाराचे काम करेल," असे RBI ने सांगितले.

नोव्हेंबर 2021 मध्ये, आरबीआयने अनिल अंबानी-प्रमोट रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या बोर्डला वेगळे केले होते. त्यानंतर, पेमेंट डिफॉल्ट्स आणि प्रशासकीय समस्यांमुळे कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यात आली. कंपनीचे एकूण कर्ज 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ हटवले होते. एलआयसी आणि ईपीएफओच्या विनंतीवरून रिलायन्स कॅपिटलच्या ई-लिलावाचा निर्णय घेण्यात आला होता.

शेअर बाजारातील व्यवहार ठप्प :

रिलायन्स कॅपिटलचे व्यवहार गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प झाले आहेत. कंपनीच्या शेअरची किंमत 9.14 रुपये होती आणि मार्केट कॅप 230.98 कोटी रुपये होते.

टॅग्स :BusinessrbiAmbani