Share Market: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

सोमवारी बाजार पुन्हा तेजीसह बंद झाला
Share Market
Share MarketSakal

सोमवारी बाजार पुन्हा तेजीसह बंद झाला. सोमवारी इंट्राडेमध्ये निफ्टी 18641.20 पर्यंत गेला. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 18600 च्या जवळ बंद झाला. सोमवारी सुमारे 1,899 शेअर्समध्ये तेजी दिसली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 344.69 अंकांनी अर्थात 0.55 टक्क्यांनी वाढून 62,846.38 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 99.40 अंकांनी म्हणजेच 0.54 टक्क्यांनी वाढून 18598.70 वर बंद झाला आहे.(Latest Marathi News)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने गेल्या आठवड्यात बाजूच्या कंसोलिडेशनमधून ब्रेकआउट केल्यानंतर फॉलो-थ्रू खरेदी पाहिल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. निफ्टी साईडवेज ट्रेड करताना दिसला. चांगल्या तेजीनंतर कंसोलिडेशनची प्रक्रिया पॉझिटीव्ह दिसली. डेली मोमेंटम इंडिकेटरने शेवटी तेजीचा क्रॉसओव्हर दिला आहे

डेली बोलिंजर बँडचा विस्तार होऊ लागला आहे. त्याच वेळी वरच्या काठासह किंमत वाढत असल्याचे दिसते. हे तेजीचा ट्रेंड सुरू असल्याचे संकेत देते. सध्या प्राईस आणि मोमेंटम दोन्ही इंडिकेटर तेजी जारी राहिल याचे संकेत देत आहेत. अशा स्थितीत निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 18800 च्या दिशेने जाताना दिसून येईल. तर खाली 18500-18580 वर सपोर्ट दिसत आहे.(Latest Marathi News)

Share Market
Sensex : सेन्सेक्स ६३ हजारांजवळ; ३४४ अंश वाढला

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

टायटन (TITAN)

कोल इंडिया (COALINDIA)

टाटा स्टील (TATASTEEL)

अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

भारत फोर्ज (BHARATFORG)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

ए यू बँक (AUBANK)

श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

व्होल्टास (VOLTAS)

Share Market
Share Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्स 400 अंकांनी वर, बँक निफ्टीचा विक्रमी उच्चांक

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com