Experts favourite Share List
Sakal
Stock Market Outlook : 2025 च्या वर्ष समाप्तीला अवघे काही दिवसचं उरले असताना ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठ्या हालचाली दिसून येत आहे. अलीकडील तेजीमुळे शेअर बाजाराचा कल सध्या मजबूत वाटत आहे. चांगले आर्थिक संकेत, अमेरिकन फेड दार कपातीमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची पुन्हा होत असलेली गुंतवणूक आणि अमेरिकेशी संबंधित सकारात्मक व्यापार करारांमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदाराच्या भावना सध्या सकारात्मक झाल्या आहेत.