Bharat Dynamics : भारत डायनॅमिक्सच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी, काय आहेत कारणे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Dynamics

Bharat Dynamics : भारत डायनॅमिक्सच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी, काय आहेत कारणे ?

डिफेन्स सेक्टरमधील पीएसयू भारत डायनॅमिक्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी तेजी पाहायला मिळत आहे. त्याचे शेअर्स बुधवारी इंट्रा-डेमध्ये बीएसईवर जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 984.50 रुपयांवर पोहोचले. मजबूत व्यावसायिक दृष्टिकोनामुळे गेल्या दोन आठवड्यांत ते 23 टक्क्यांनी वाढले आहे. (Bharat Dynamics shares increased read reasons )

मोठ्या ऑर्डरमुळे त्याच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. भारत डायनॅमिक्सच्या मते, त्याला 25.5 कोटी डॉलरच्या एक्सपोर्ट ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात त्याचे शेअर्स खरेदी करत आहेत. , मात्र, त्याला सरकारकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. याशिवाय एअरो इंडिया-2023 दरम्यान काही देशी आणि विदेशी कंपन्यांसोबत त्यांनी 10 सामंजस्य करार केले आहेत.

भारत डायनॅमिक्स जमिनीवरून हवेत मारा करणारे मिसाइल्स, अँटी-टँक गायडेड मिसाइल्स, हवेतून हवेत मारा करणारे मिसाईल्स, अंडरवॉटर व्हेपन्स, लॉन्चर्स, काऊंटरमेजर्स आणि टेस्ट इक्विपमेंट्स तयार करते. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने गेल्या महिन्यात 8 फेब्रुवारी 2023 च्या अहवालात त्यावर बाय रेटिंग कायम ठेवली आणि 1,010 रुपयांचे टारगेट निश्चित केले.

एअरो इंडिया-2023 दरम्यान, भारत डायनॅमिक्सने काही देशी आणि विदेशी कंपन्यांसोबत 10 सामंजस्य करार केले. कंपनीने भारतात लेझर-गायडेड रॉकेट आणि त्याचे महत्त्वपूर्ण कंपोनेंट्सचा प्लांट बनवण्यासाठी थेल्ससोबत सामंजस्य करार केला आहे.

याव्यतिरिक्त, कंपनीने यूएईच्या एज ग्रुप एंटिटी एएल तारिक सोबत एक सामंजस्य करार केला आहे. भारत डायनॅमिक्सने एअरो इंडिया 2023 मध्ये तीन नवीन उत्पादनेही लाँच केली.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.