Bharat Forge Share: भारत फोर्जची विक्रमी घोडदौड, कल्याणी राफेलला मिळालेल्या ऑर्डरमुळे शेअर्समध्ये तेजी

Bharat Forge Share Price: कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी होत आहे.
Share Market
Share Market sakal

Bharat Forge Share Price: भारत फोर्जच्या (Bharat Forge) शेअर्सने नुकताच त्याचा ऑल टाइम हायवर पोहोचला. बीएसईवर शेअर 2.60 टक्क्यांच्या वाढीसह 1056 रुपयांवर गेला. कल्याणी राफेल ऍडव्हान्स्ड सिस्टीम्सला 287.51 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीला मिसाईल सिस्टम पुरवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ही ऑर्डर मिळाली आहे. या घोषणेनंतर सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.

कल्याणी राफेल ऍडव्हान्स्ड सिस्टम्स ही भारत फोर्जची संपूर्ण मालकीची डिफेन्स सब्सिडियपी कंपनी असलेल्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स आणि इस्रायलच्या राफेल ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.

Share Market
Reliance AGM 2023: : रिलायन्स इंडस्ट्रीज ने दहा वर्षात दीडशे अब्ज डॉलर गुंतवले

संरक्षण अधिग्रहण परिषदेने गेल्या आठवड्यात 7800 कोटीच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर कल्याणी राफेलला ही ऑर्डर मिळाली.

आर्थिक वर्ष 24 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक 35.98 टक्क्यांनी वाढून 3,877 कोटी झाला आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 33.75 टक्क्यांनी वाढून 214 कोटीवर पोहोचला आहे. तिमाहीसाठी ऑपरेटिंग नफ्याचे मार्जिन 15 टक्क्यांवर स्थिर राहिले.

Share Market
Multibagger Stock: 3 वर्षात 430% रिटर्न, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का 'हा' शेअर?

भारत फोर्ज लिमिटेड ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रियल आणि एनर्जी सेक्टरसाठी फोर्जिंग्ज तयार करते. कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स आणि राफेल सिस्टीम्स या उपकंपन्यांसोबत त्यांचा संयुक्त उपक्रम अत्याधुनिक शस्त्रे आणि इतर संरक्षण उपकरणे तयार करते.

Share Market
Multibagger Stock: गुंतवणूकदार झाले मालामाल! रेल्वे कंपनीच्या शेअरने पकडला बुलेट ट्रेनचा वेग

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com