Bharat Highways Invit IPO : भारत हायवेज इनविटचा आयपीओ खुला, अधिक जाणून घेऊ...

भारत हायवेज इनविटचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर 98-100 रुपये ऑफर प्राइस ठेवली आहे. 2500 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
Bharat Highways Invit IPO
Bharat Highways Invit IPOsakal
Updated on

भारत हायवेज इनविटचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर 98-100 रुपये ऑफर प्राइस ठेवली आहे. 2500 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. गुंतवणूकदारांना त्यात गुंतवणूक करण्याची संधी 1 मार्चपर्यंत असेल. या इन्फ्रा-इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मसुदा पेपर दाखल केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्याला मंजुरीही मिळाली.

आयपीओ आकाराच्या सुमारे 75 टक्के पात्र संस्थात्मक बोलीदारांसाठी (QIB) आणि 25 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) राखीव ठेवण्यात आले आहेत. गुंतवणूकदार कमीत कमी 150 शेअर्ससाठी लॉटमध्ये आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, एचडीएफसी बँक आणि आयआयएफएल सिक्युरिटीज या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग करण्याचा प्रस्ताव आहे.

या आयपीओतून उभारलेला निधी प्रोजेक्ट SPVs अर्थात स्पेशल पर्पज व्हेइकलच्या थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी वापरला जाईल. यासोबतच ही रक्कम कंपनीच्या सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत, प्रोजेक्ट SPV सह एकूण एक्सटर्नल बोरोइंग 3,568.22 कोटी होती.

भारत हायवेज इनविट ही भारतातील इंफ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट आहे आणि त्यांचा उद्देश भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर ऍसेट्समध्ये गुंतवणूक आणि मॅनेज करणे हा आहे. कंपनीच्या सुरुवातीच्या पोर्टफोलिओमध्ये पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये एचएएम अर्थात हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या सात रस्ते ऍसेट्सचा समावेश आहे, ज्यामध्ये सुमारे 497.292 किमी बांधलेले आणि ऑपरेशनल रस्ते आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com