
भूषण ओक
बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लि. (बीएलएस इंटरनॅशनल) ही २००५ मध्ये स्थापन झालेली एक आघाडीची जागतिक आउटसोर्सिंग व तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी आहे. ती ७० देशांमध्ये कार्यरत असून, ४६ देशांच्या सरकारांना सेवा पुरवते. तिच्या मुख्य सेवांमध्ये व्हिसा, दस्तावेज पडताळणी व प्रमाणीकरण, बायोमेट्रिक्स, ई-व्हिसा, तर नागरिकता सेवांमध्ये पासपोर्ट नूतनीकरण, प्रवास दस्तावेजांची पडताळणी व कायदेशीर प्रमाणीकरण आदींचा समावेश होतो. विमा, लाऊंज सेवा, दस्तावेज भाषांतर आदी सेवाही ती पुरवते.