BLS Polymers IPO: Jio पेक्षा 11 पट जास्त सबस्क्रिप्शन! 15 हजारांच्या गुंतवणुकीवर 6,800 रुपये नफा? अलॉटमेंट स्टेटस असे चेक करा

BLS Polymers IPO Allotment: BLS Polymers IPO ला तब्बल 241.22 पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे. तुम्हीही या IPO मध्ये पैसे गुंतवले असतील, तर अलॉटमेंट स्टेटस कसं तपासायचं, तसेच GMP नुसार किती नफा होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या.
BLS Polymers IPO

Subscribed 11 Times More Than Jio IPO! Will ₹15,000 Investment Earn ₹6,800 Profit?

eSakal

Updated on: 

BLS Polymers IPO allotment date and status check online: सध्या शेअर बाजारात BLS Polymers IPO ची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या IPO ला गेल्या आठवड्यात आलेल्या Jio Platforms IPO पेक्षा जवळपास 11 पट जास्त सबस्क्रिप्शन मिळालं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष आता शेअर अलॉटमेंटकडे लागलं आहे. शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी या IPO च्या शेअर अलॉटमेंटची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या IPO साठी अर्ज केलेले गुंतवणूकदार KFin Technologies आणि BSE च्या अधिकृत वेबसाइटवर अलॉटमेंट स्टेटस तपासू शकतात. NSE वर मात्र IPO बिडची माहिती तपासता येईल.

Loading content, please wait...