Bombay Super Hybrid Seeds : दररोज गाठतोय नवा उच्चांक, या शेअरमध्ये तेजी सुरुच

ही एक कृषी पेरणी बियाणे कंपनी आहे जी शेतकऱ्यांना विविध पिकांचे उच्च दर्जाचे बियाणे पुरवते
Bombay Super Hybrid Seeds
Bombay Super Hybrid Seedssakal

Bombay Super Hybrid Seeds : गेल्या काही काळापासून शेअर बाजारात सतत चढ उतार दिसत आहे. पण अशातचही असा एक शेअर आहे ज्याची किंमत रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. एवढेच नाही तर त्यांनी केवळ दीड ते दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 67 लाख रुपयांमध्ये रूपांतरित केले.

बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स (Bombay Super Hybrid Seeds) असे या शेअरचे नाव आहे. ही एक कृषी पेरणी बियाणे कंपनी आहे जी शेतकऱ्यांना विविध पिकांचे उच्च दर्जाचे बियाणे पुरवते. (Bombay Super Hybrid Seeds shares are in growth read story )

बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्सच्या शेअर्सना गुरुवरी 5 टक्क्यांचे अपर सर्किट लागले होते, आणि के 603.85 रुपयांवर बंद झाले. त्याच्या शेअर्सची ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. सलग 9व्या दिवशी कंपनीच्या शेअर्सनी अपर सर्किटला धडक मारली. या दरम्यान, त्याचे शेअर्स सुमारे 47.68% वाढले आहेत.

Bombay Super Hybrid Seeds
Stock Split : 3 वर्षात 510 टक्के वाढ, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा

बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्सच्या शेअर्सनी 30 ऑक्टोबर 2020 रोजी बीएसईवर ट्रेडींग सुरू केली. त्यावेळी त्याची किंमत फक्त 8.90 रुपये होती, जी आता 603.85 रुपये झाली आहे. अशाप्रकारे, गेल्या अडीच वर्षांत हा शेअर सुमारे 6,684.83% वाढला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 30 ऑक्टोबर 2020 रोजी बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख रुपये आता सुमारे 6,684.83% ते 67.84 लाख रुपये झाले असते.

Bombay Super Hybrid Seeds
Stock Split : 'या' शेअरकडून स्टॉक स्प्लिटची घोषणा, अधिक जाणून घेऊयात...

बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्सचा हिस्सा गेल्या एका वर्षात सुमारे 1,694.50% वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 महिन्यात ते 145.52% वाढले आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 1 लाख रुपये आज 17.94 लाख झाले असते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com