150 Years Of BSE: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हा देशातील आणि आशियातील सर्वात जुना शेअर बाजार आहे. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. वडाच्या झाडाखाली सुरू झालेला हा प्रवास आज जवळपास 90 हजार पॉइंट्सवर पोहोचला आहे..1875 मध्ये ‘नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन’ या नावाने या संस्थेची स्थापना झाली होती. त्या आधी काही व्यापारी 1855 पासूनच मुंबईतील वडाच्या झाडाखाली एकत्र येऊन कापसाची खरेदी-विक्री करत होते. हीच खरेदी-विक्री पुढे शेअर बाजारात बदलली.या संस्थेचे प्रमुख संस्थापक प्रेमचंद रॉयचंद होते. त्यांना ‘बॉम्बेचा कॉटन किंग’ असंही म्हणत असत. या संस्थेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी तेव्हा फक्त एक रुपया भरावा लागत असे..EPF Interest Rate: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएफ खात्यात व्याजाचे पैसे झाले जमा; असा तपासा बॅलन्स?.BSE ने 1986 मध्ये भारताचा पहिला शेअर निर्देशांक 'सेन्सेक्स' सुरू केला. त्याची सुरुवात 100 पॉइंट्सपासून झाली होती. 1990 मध्ये सेन्सेक्सने 1,000, 1999 मध्ये 5,000 आणि 2007 मध्ये 20,000 चा टप्पा पार केला. 2024 मध्ये त्याने 80,000 अंकांचा टप्पा गाठला आणि 2025 मध्ये 85,000 चा उच्चांक केला..Elon Musk: 24 तासांत 1,31,000 कोटी रुपयांचे नुकसान; इलॉन मस्क यांची संपत्ती रोज कमी का होत आहे?.सध्या BSE वर 4,100 पेक्षा जास्त कंपन्या लिस्ट आहेत आणि एकूण बाजार भांडवल 419 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आज BSE हे केवळ शेअर बाजार नसून भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे प्रतीक बनले आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या या दीडशे वर्षांच्या प्रवासात BSE ची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या ऐतिहासिक टप्प्याच्या निमित्ताने अनेकांनी BSE ला शुभेच्छा दिल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.