
Tata Motors Shares Fall: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या करवाढीच्या घोषणेने जगातील अनेक देशांची झोप उडवली आहे. नुकतेच व्हेनेझुएलावर टॅरिफची घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील परदेशी कार आणि त्यांच्या पार्टवर 25 टक्के शुल्क लागू करणार असल्याची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल, असा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. तसेच, यातून अमेरिकेला दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळेल.