DSSL Share: डायनॅकॉन्स सिस्टिम्स अँड सोल्युशन्स लि.
High Growth Stock: डायनॅकॉन्स सिस्टिम्स ही आयटी पायाभूत सेवा देणारी वेगाने वाढणारी कंपनी आहे. ग्राहकांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने रोकड प्रवाहात तुटवडा जाणवतो, म्हणून सध्या थांबून गुंतवणूक करावी.
डा यनॅकॉन्स सिस्टिम्स अँड सोल्युशन्स लि. (डीएसएसएल) ही १९९५ मध्ये स्थापन झालेली, मुंबईमध्ये मुख्यालय असलेली एक आयटी कंपनी आहे, जिच्या भारतभर शाखा आहेत. देशभरात ३००हून अधिक ठिकाणी कंपनीचा व्यवसाय चालतो.