Share Market : साडेअकरा हजारकोटींच्या शेअरची परदेशी गुंतवणुकदारांकडून खरेदी

फेब्रुवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ५,२९४ कोटी रुपये मूल्याच्या शेअरची विक्री
Foreign institutional investors invested Rs11500 crores in Indian stock market
Foreign institutional investors invested Rs11500 crores in Indian stock market Sakal

मुंबई : मार्च महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात साडेअकरा हजार कोटी रुपये गुंतवले असले तरी यापुढे अमेरिकन बँकांमधील गोंधळाचे वातावरण पाहता त्यांचे इनकमिंग सुरू राहील का याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

Foreign institutional investors invested Rs11500 crores in Indian stock market
Share Market Tips : 'ही' पॉवर कंपनी देणार तगडा रिटर्न, तुम्हाला माहिती आहे का?

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरचे भाव पडल्यामुळे तळाच्या भावात खरेदी करण्यासाठी जी क्यू जी पार्टनर सारख्या काही परदेशी संस्थांनी अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर एकगठ्ठा खरेदी केले होते. त्यामुळे सतरा मार्चपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ११ हजार ४९५ कोटी रुपये गुंतवल्याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ५,२९४ कोटी रुपये मूल्याच्या शेअरची विक्री केली होती. तर जानेवारीत त्यांनी २८ हजार ८५२ कोटी रुपये शेअर बाजारातून काढून घेतले होते. डिसेंबर मध्ये त्यांनी अकरा हजार कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले होते, असेही या तपशिलात नमूद केले आहे.

Foreign institutional investors invested Rs11500 crores in Indian stock market
Share Market : निर्देशांक तेजीच्या लाटेवर स्वार; निफ्टी १७ हजारांवर सेन्सेक्स ५८ हजारांजवळ

या महिन्यातही परदेशी गुंतवणूकदारांनी अदानी ग्रुपच्या समभागांची खरेदी केली असली तरी त्या व्यतिरिक्त त्यांनी जोरदार विक्रीच केली आहे. सन २०२३ मध्ये आतापर्यंत त्यांनी २२,६५१ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. तर दीर्घ कालावधीसाठी सध्या भारतीय शेअरचे मूल्यांकन योग्य वाटत असल्यामुळेच परदेशी गुंतवणूकदार खरेदी करत असल्याचे मॉर्निंग स्टार इंडियाचे हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितले.

कॅपिटल गुड्स क्षेत्रात परदेशी गुंतवणूकदार सातत्याने खरेदी करत असल्याचेही तज्ञांनी दाखवून दिले. तर बँका आणि वित्त संस्थांमध्ये त्यांचा खरेदी विक्रीचा खेळ चालू आहे. अमेरिका व युरोपमधील बँकांमधील गोंधळाचे वातावरण दूर होईपर्यंत इतक्यात तरी परदेशी गुंतवणुकदार जोमाने खरेदी करणार नाहीत, असे जिओजित फायनान्स सर्विसेस चे विजयकुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com