
FSSAI Action on Patanjali Foods: FSSAIने बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. FSSAI ने कंपनीची लाल मिरची पावडरची संपूर्ण बॅच बाजारातून मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.
लाल मिरची पावडरच्या एका विशिष्ट बॅचने अन्न नियामक FSSAI च्या मानकांची पूर्तता केली नाही, त्यानंतर FSSAIने हा आदेश दिला आहे. कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. या कारवाईनंतर आज कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.