

gold rate news may wedding season market rate
esakal
Gold rates down in India : अमेरिका इराण युद्धाचा परिणाम सोने चांदी दरावर होत असताना पहायला मिळत आहे. मागच्या ५ महिन्यात सोने तब्बल ३० ते ४० हजारांनी स्वस्त होऊ दिड लाखांच्या घरात दर येऊन थांबला आहे. तर चांदी तब्बल २ लाखांनी उतरून अडिच लाखांवर येऊन थांबली आहे. दरम्यान, अमेरिका इराण युद्धविरामानंतर कच्चा तेलाचे दर वाढत असले तरी सोने चांदीच्या दरात मात्र घसरण होत असताना पहायला मिळत आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी १ लाख ५२ हजारांवर सोने थांबले तर चांदी २ लाख ६१ हजारांवर येऊन थांबली आहे.