

Gold silver rate Maharashtra
esakal
Share Market Gold Silver News : सुवर्ण बाजारामध्ये चांदीने ऐतिहासिक उच्चांक नोंदविला. चांदीच्या भावामध्ये पुन्हा पंधरा हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीने वस्तू आणि सेवाकरासह (जीएसटी) ३ लाख ५० हजार २०० रुपयांचा (प्रति किलो) टप्पा पार केला आहे. सोन्याच्या भावात मात्र आज १० हजार १०० रुपयांची घट झाली. सोने आज ‘जीएसटी’सह १ लाख ४८ हजार ३४७ रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) पोहोचले होते. गेल्या महिनाभरापासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अनेकदा यात घसरणही झाल्याचे दिसून येते.