Hindustan Unilever Ltd. : हिंदुस्थान युनिलिव्हरतर्फे २४ रुपये लाभांश जाहीर

हिंदुस्तान युनिलिव्हर लि.ने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत नफ्यात दोन टक्क्यांनी घट नोंदवली आहे.
Hindustan Unilever Ltd announced of 24 rs dividend per share
Hindustan Unilever Ltd announced of 24 rs dividend per shareSakal

मुंबई : हिंदुस्तान युनिलिव्हर लि.ने आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत नफ्यात दोन टक्क्यांनी घट नोंदवली आहे. कंपनीने या तिमाहीत २,५६१ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मार्च २०२३ च्या तिमाहीत तो २,६०१ कोटी रुपये होता. कंपनीने प्रति शेअर २४ रुपये अंतिम लाभांशाची घोषणा केली आहे.

कंपनीने आज तिमाही निकाल जाहीर केले.कंपनीचा या तिमाहीतील व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचा महसूल ३५३५ कोटी रुपये असून, मार्च २०२३ च्या तिमाहीत तो ३५७४ कोटी रुपये होता. त्या तुलनेत त्यात एक टक्क्यांनी घसरण झाली आहे. कंपनीने एकूण विक्रीत मात्र एक टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. मार्च २०२४ तिमाहीत कंपनीने १५,०४१ कोटी रुपयांची विक्री केली आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने एकूण ६०,९६६ कोटी रुपयांची विक्री केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने १६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रति शेअर १८ रुपये अंतरिम लाभांश दिला होता. आता २४ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीसाठी एकूण प्रत्येकी एक रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरसाठी ४२ रुपये लाभांश भागधारकांना मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com