
HMPV Virus Impact On Indian Stock Market: आज भारतीय शेअर बाजार पुन्हा घसरले आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला. निफ्टीही 23,600 च्या खाली घसरला. जेव्हा चीनमध्ये पसरलेल्या HMPV या नवीन विषाणूची बातमी भारतात आली तेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.
भारतात आतापर्यंत एकूण 8 रुग्ण आढळून आले आहेत. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या विषाणूमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार विक्री करत आहेत.