
Stock Market Today: बुधवारी सकाळी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत ही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली.
लष्कराने या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले आहे. सकाळी या हल्ल्याचा भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम झाला नाही. आज बुधवारी सेन्सेक्स 107 अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी सुमारे 9.75 अंकांच्या घसरणीसह उघडला.