
Jim Walker On Indian Stock Market: अॅलिथीया कॅपिटलचे मुख्य अर्थतज्ज्ञ जिम वॉकर यांचे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जिम वॉकर यांनी 2008 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली होती. आता त्यांनी 2025 साठी चार महत्त्वाचे जागतिक अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार, अमेरिकन डॉलरमध्ये 10% घसरण होईल, जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सामना करावा लागेल, तांब्यातील गुंतवणूक दीर्घकाळात चांगला परतावा देईल आणि भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढविण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.