Share Market Opening : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये? l know which share will perform today on action shares before share market opening | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Share Market Opening : सोमवारी सलग सातव्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी घसरणीवर बंद झाला. सेन्सेक्स 176 अंकांनी घसरून 59288 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 73 अंकांनी घसरून 17393 च्या पातळीवर बंद झाला. सोमवारी सर्वाधिक खरेदी रियल्टी, बँकिंग शेअर्समध्ये झाली. निफ्टी बँक 398 अंकांनी वाढून 40307 वर बंद झाला. मेटल, आयटी आणि ऑटो शेअर्स घसरले. फार्मा, एफएमसीजी आणि इन्फ्रा शेअर्स दबावाखाली होते. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही दबाव दिसून आला. मिडकॅप 209 अंकांनी घसरून 29895 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी सोमवारी कमजोरीने उघडला आणि दिवसभर चढ-उतार पाहिल्याचे शेअर खानचे जतीन गेडिया म्हणाले. व्यवहाराअंती बाजार सलग सातव्या दिवशी घसरला. डेली चार्टवर निफ्टीने रायझिंग सपोर्ट लाईन तोडत या खाली बंद झाला. हे निफ्टी आणखी कमजोर होण्याचे संकेत आहेत. निफ्टी 17376 वर 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या आसपास फिरत आहे. पण निफ्टीला इथे सपोर्ट मिळू शकतो.

निफ्टीमधील आवर्ली मोमेंटम इंडिकेटर पॉझिटीव्ह डायव्हर्जंस देत आहे. यासोबतच त्यात पॉझिटीव्ह क्रॉसओव्हरही पाहायला मिळत आहे. डाउनसाइडवर विक्रीचा दबाव कमी होत असल्याची ही चिन्हं आहे. सतत डाउनट्रेंडच्या 7 ट्रेडिंग सत्रांनंतर, नंतर एक पुल बॅक दिसू शकतो. पण याला हे ट्रेंड रिव्हर्सल म्हणून मानले जाणार नाही असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

टाटा स्टील (TATASTEEL)

इन्फोसिस (INFY)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

एमआरएफ (MRF)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

ज्युबिलंट फूड (JUBLFOOD) (Stock)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.