Share Market : 'या' शेअरने 20 वर्षात अत्यंत कमी गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 'या' शेअरने 20 वर्षात अत्यंत कमी गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश

Share Market Investment Tips : शेअर बाजारात पैसे कमावणे सोपे आहे असे म्हटले जाते, पण त्यासाठी दमदार फंडामेंटल असणारे शेअर्सची निवड करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण अशाच दमदार स्टॉकमध्ये गोदरेज इंडस्ट्रीजची गणना होते.

कारण त्याने अवघ्या 20 वर्षात अत्यंत कमी गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या वर्षी गोदरेजचे शेअर्स आतापर्यंत 2.5 टक्क्यांनी घसरले असले तरी शेअर मार्केट एक्सपर्ट्सना यात तेजी येईल असा विश्वास वाटत आहे.

सध्या हे शेअर्स 424.35 रुपयांवर ट्रेड करत आहेत. पण लवकरत ते 628 रुपयांपर्यंत जातील असे तज्ज्ञांना वाटत आहे. हे टारगेट सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 48 टक्के जास्त आहे.

गोदरेजचे व्हॅल्यू त्याच्या लिस्टेड सब्सिडियरीज आणि असोसिएट्स जसे की गोदरेज कंझ्युमर, गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज ऍग्रोव्हेट यांच्याकडून जनरेट होते.

या सर्व सब्सिडियरीज आणि असोसिएट्सची टारगेट प्राईस आणि 5 टक्के होल्डको डिस्काऊंट यावरुन देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने गोदरेज इंडस्ट्रीजमधील गुंतवणुकीसाठी प्रति शेअर 628 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

डिसेंबर 2022 ची तिमाही गोदरेजसाठी चांगली होती. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 23.3 कोटी रुपयांवरून 78.4 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

14 फेब्रुवारी 2003 रोजी गोदरेजचे शेअर्स 2.62 रुपयांना उपलब्ध होते. आता तो 162 पटीने वाढून 424.35 रुपये आहे, म्हणजेच 20 वर्षांत गोदरेजने केवळ 62,000 रुपयांच्या गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.