
हाँगकाँगच्या Pop Mart International कंपनीची लबूबू डॉल जागतिक बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहे.
एका वर्षात शेअरमध्ये तब्बल 609% वाढ झाली असून गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न मिळाला.
CEO वांग निंग यांची संपत्ती एका वर्षातच 18.5 अब्ज डॉलरने वाढून 26.6 अब्ज डॉलर झाली आहे.
CEO Wang Ning: हॉंगकाँग बेस्ड कंपनी Pop Mart International ची लबूबू डॉल (Labubu Doll) सध्या जागतिक पातळीवर धुमाकूळ घालत आहे. बाहेर आलेले बारीक दात, मोठे कान आणि मोठे डोळे असलेली ही डॉल तरुणाईत एवढी लोकप्रिय झाली आहे की, तिच्या विक्रीतून कंपनी आणि गुंतवणूकदार अक्षरशः मालामाल झाले आहेत.