
Share Market Profit
esakal
शेअर बाजारात आज अर्बन कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी करत गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. १०३ रुपये प्रति शेअर या आयपीओ किमतीवर बाजारात उतरलेला हा शेअर पहिल्याच दिवशी १७२.१५ रुपयांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे गुंतवणूकदारांना ६७ टक्क्यांचा बंपर नफा मिळाला. ऑनलाइन मार्केटप्लेस असलेल्या अर्बन कंपनीने आपल्या मजबूत व्यवसाय मॉडेल आणि जबरदस्त सब्स्क्रिप्शनमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे.