Multibagger Power Stock: ₹2 Share Jumps to ₹135, Delivers 6,750% Return in 2.5 Years
eSakal
Share Market
Multibagger Stock: पॉवर सेक्टरचा मल्टीबॅगर! 2 रुपयांचा शेअर पोहोचला 135 वर, अडीच वर्षांत 6,750% रिटर्न; गुंतवणूकदार झाले मालामाल
Multibagger Stock: भारतीय शेअर बाजारात सध्याच्या चढ-उतारातही एक पॉवर सेक्टरचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. केवळ अडीच वर्षांतच मोठा रिटर्न दिल्याने गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष्य लागून आहे.
Multibagger Stock: सध्या भारतीय शेअर बाजारात मोठे चढ-उतार सुरू आहेत. मात्र शेअर बाजारातील चढ-उताराच्या वातावरणातही काही शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अशाच मल्टीबॅगर शेअर्समध्ये सध्या Diamond Power Infrastructure Limited या स्मॉलकॅप कंपनीचे नाव चर्चेत आहे. या शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना एवढा नफा कमावून दिला आहे की तुम्ही कल्पना देखील करू शकतं नाही. चला जाणून घेऊयात या मल्टीबॅगर स्टॉक विषयी...

