Investors’ Opportunity: Check Out 4 New IPOs Coming Soon, Including a 1,300 Crore Issue
Sakal
Stock Market IPO : नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजारात IPO ची संख्या तुलनेने कमी दिसत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्य बाजारात फक्त एकच IPO येणार असून, SME सेगमेंटमध्ये तीन IPO येणार आहेत. साधारणपणे तसं बघितलं तर जानेवारी महिना IPO साठी शांत असतो. वर्षाअखेरीच्या सुट्ट्यांनंतर गुंतवणूकदार बाजाराची दिशा समजून घेण्यासाठी थोडा वेळ घेतात. मात्र, पुढील काही आठवड्यांत मोठ्या IPO ची रांग लागण्याची शक्यता आहे.