New IPO : 31 मार्चला खुला होणार आणखी एक आयपीओ, अधिक जाणून घेऊयात... | IPO of MOS Utility will open on 31 March | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयपीओ

New IPO : 31 मार्चला खुला होणार आणखी एक आयपीओ, अधिक जाणून घेऊयात...

एमओएस युटिलिटीचा (MOS Utility) आयपीओ शुक्रवारी 31 मार्चला खुला होणार आहे. ही कंपनी डिजिटल प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसमध्ये गुंतली आहे. ही कंपनी B2B आणि B2B2C सेगमेंटमध्ये काम करते. आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल 2023 असेल. ((New IPO of MOS Utility will open on 31 March know about last date of investment))

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) फायलिंगनुसार, कंपनी आयपीओमध्ये प्रत्येकी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 65,74,400 इक्विटी शेअर जारी करेल. यामध्ये 57,74,400 इक्विटी शेअर्स फ्रेश इश्यूद्वारे जारी केले जातील.

ऑफर फॉर सेलमध्ये 8,00,000 इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. आयपीओनंतर एमओएस युटिलिटीचे शेअर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले जातील. युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तर स्कायलाईन फायनांशियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहेत.

एमओएस युटिलिटीचा आयपीओ 31 मार्च ते 6 एप्रिल 2023 पर्यंत खुला असेल. 12 एप्रिलला शेअरचे ऍलॉटमेंट होऊ शकते. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाणार नाही, त्यांची रक्कम 13 एप्रिलपर्यंत परत केली जाईल.

तर डिमॅट खात्यातील शेअर्स 17 एप्रिलला येतील. एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर शेअर्सची लिस्टींग 18 एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketIPOInvestment