
Olectra Greentech Share Price: इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेकच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका पोस्टमध्ये सांगितले की, 5,150 भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत.
त्यामुळे कंपनीचे शेअर्स 12 % घसरले. मागील बंद झालेल्या 1,345 रुपयांच्या तुलनेत हा शेअर 1,180 रुपयांवर घसरला. त्यांनी स्पष्टपणे कोणत्याही कंपनीचे नाव घेतले नसले तरी, हा निर्णय ओलेक्ट्रा ग्रीनटेकशी संबंधित एका ग्रुपकडे निर्देश करत असल्याचे संकेत आहे.