
लोकसभेत ऑनलाइन गेमिंग बिल पास होऊन रिअल मनी गेमिंगवर बंदी घालण्यात आली.
या निर्णयाचा फटका थेट नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सना बसला, दोन दिवसांत मार्केट कॅपमध्ये 2,000 कोटींची घट झाली.
तज्ज्ञांचे मत आहे की हा कायदा डिजिटल गेमिंग इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचा आहे, पण लोक बेकायदेशीर गेमिंगकडे वळण्याचा धोका वाढेल.
Online Gaming Bill 2025: ऑनलाइन गेमिंगवर मोठा निर्णय घेत लोकसभेत बुधवारी (20 ऑगस्ट 2025) ऑनलाइन गेमिंग बिल पास करण्यात आले. या कायद्यानुसार रिअल मनी गेमिंग (RMG) वर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय समाजाच्या हितासाठी असल्याचे स्पष्ट केले.