

Renewable Energy Giant’s ₹31,000 Crore IPO Opens: Key Details Investors Must Know
eSakal
Clean Max Enviro Energy Solutions IPO: देशातील सर्वात मोठ्या कमर्शियल आणि इंडस्ट्रियल रिन्यूएबल एनर्जी सेवा पुरविणाऱ्या Clean Max Enviro Energy Solutions चा IPO कालपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनी सुमारे ₹3,100 कोटी उभारणार आहे. या इश्यूचा प्राइस बँड ₹1,000 ते ₹1,053 दरम्यान ठेवण्यात आला असून IPO उद्या म्हणजेच 25 फेब्रुवारीपर्यंत खुला राहणार आहे. यामध्ये ₹1,200 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹1,900 कोटींचा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे.