
मोहित सूरीचा ‘सैयारा’ बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्यावर कमाई करत आहे.
या चित्रपटामुळे PVR INOXच्या शेअर्समध्ये 1.28% पर्यंत वाढ झाली आणि मल्टीप्लेक्स उद्योगाला मोठा आधार मिळाला.
हिंदीसह प्रादेशिक चित्रपटांनीही 2025 मध्ये विक्रमी कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर कमाई केली.
PVR Inox Share Price: सध्या चित्रपटगृहांमध्ये मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ने धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तर झपाट्याने वाढत आहेच, पण याचा फायदा PVR INOXच्या शेअर्सनाही मिळतोय. सोमवारी PVR INOXचा शेअर 13.05 अंकांनी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वाढून 1,032.45 रुपयांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात हा शेअर 1,045 रुपयांच्या उच्चांकावरही पोहोचला. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 2.5 टक्क्यांपर्यंतची वाढ पाहायला मिळाली.